Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने १४०० जेष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना स्मार्ट कार्डचे वाटप’

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने आयुष्मान भारत वय वंदना स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. (PCMC)

आयुष्मान वय वंदना कार्ड हे सामाजिक-आर्थिक स्थिती न पाहता 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हे कार्ड सुमारे 2000 वैद्यकीय प्रक्रियांचे उपचार देते आणि कोणत्याही प्रतीक्षा कालावधी शिवाय पहिल्या दिवसापासून सर्व विद्यमान आजारांना कव्हर करते.

आतापर्यंत माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या माध्यमातून १४०० पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

नगरसेवक शेडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज ७० पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत वय वंदना या योजनेचे लाभार्थी करून घेतले जाते व त्यांना मोफत स्मार्ट कार्ड दिले जाते. (PCMC)

आयुष्यमान भारत ‘वय वंदना विमा’ योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्वतः व्यक्ती व त्याचे आधारकार्ड आणि आधारकार्डला लींक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles