पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे जैन सोशल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक व उद्योजक मनेष शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (PCMC)
यावेळी संस्थेच्या कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीचे प्राचार्य डॉ ए के वाळुंज उपप्राचार्या डॉ क्षितीजा गांधी, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट चे संचालक डॉ सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पौर्णिमा कदम, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वृंदा जोशी, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल ( सोमाटणे शाखा ) च्या प्राचार्या पद्मावती विडप समवेत प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या उपप्राचार्या लीजा सोजू यांच्या मार्गदर्शनाखाली 150 हून अधिक विद्यार्थ्यांना सैनिकी वेशभूषा परिधान करून बँड पथका समवेत परेड करीत उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली प्रमुख पाहुणे जैन सोशल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक व उद्योजक मनिष शहा यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, विशेष नैपुण्य मिळविलेल्या प्राध्यापकांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या गुणगौरव करण्यात आला. (PCMC)
उपस्थिता समोर विद्यार्थिनी समुहगान , योगा, मलखांब , देशभक्तीपर नृत्य, आदी सामूहिक नृत्याचे नेत्रदीपक सादरीकरण केले . उपस्थित त्यांनीदेखील त्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रमुख पाहुणे जैन सोशल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक व उद्योजक मनीष शहा म्हणाले , आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. सर्वानी देशाच्या विकासाला एकत्रित हातभार लावला पाहिजे. शिक्षणाबरोबर इतर पूरक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे.
येथील संस्थेतील तज्ञ प्राध्यापकांच्या मुळेच अल्पावधीतच या महाविद्यालयाने नावलौकिक मिळविला आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध शिक्षण, कला, क्रिडा, सामाजीक जनजागृती क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेत वैयक्तिक कामगिरी बजावत पारितोषिके देखील मिळविले आहे.
तुम्ही सर्वजण नशीबवान आहात या संस्थेत शिक्षण घेत आहात संस्थेचे संचालक डॉ. दीपक शहा नेहमीच हुशार होतकरू विद्यार्थ्यांना कमवा व शिका अंतर्गत आर्थिक मदत देत आहे. त्याना त्याच्या आवडीचे वेगवेगळे प्रशिक्षण नामांकित कंपन्यांबरोबर करार करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे . विविध कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देत , त्यांना त्यांच्या पायावर उभे करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. (PCMC)
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा आपल्या मनोगतात म्हणाले , भारताने दिलेल्या संविधानाचे प्रत्येकाने पालन करावे. आपला स्वतःचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे . जगात स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे.
विद्यार्थ्यांनीही बदलत्या तंत्रज्ञानानुसार ज्ञान आत्मसात करून येणाऱ्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचा संकल्प करावा. त्यासाठी प्राध्यापकांनी देखील विद्यार्थ्यांना सजग करण्याची भूमिका पार पाडावी. पूर्वी शिक्षक बोलणे, वाचन, फळा , खडू द्वारे विद्यार्थीना घडवीत होते . आता बदलत्या युगात स्मार्ट बोर्ड द्वारे शिक्षण प्रणाली विकसित झाली आहे.
नाविन्याची कास प्राध्यापकांनी अंगीकारून विद्यार्थ्यांना खडू, फळा, वाचना बरोबरच नवीन जगाची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी. देशाप्रती प्रेम प्राध्यापकानी विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वैशाली देशपांडे यांनी केले. पारितोषके वाचन प्रा सुकन्या बॅनर्जी यांनी तर आभार उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी मानले . ध्वजारोहण समारंभ समितीचे डॉ आनंद लुंकड प्रा शबाना शेख, पी टी इंगळे, डॉ अभय पोद्दार, संदीप शहा यांनी विशेष सहकार्य केले.
PCMC : उज्वल भवितव्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची कास अंगीकारावी – मनीष शहा यांचे आवाहन !
- Advertisement -