पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाच्या वतीने ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. खराळवाडी येथील पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे महाराष्ट्र महासचिव अकीलभाई मुजावर व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. AIMIM पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व महाराष्ट्र राज्य महासचिव अकिलभाई मुजावर यांच्या सूचनेनुसार पिंपरी मध्ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या नावाने घोषणा देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र महासचिव अकीलभाई मुजावर यांनी असे मत व्यक्त केले कि, आज देशात जाती धर्मच्या नावाने दंगली भडकवण्याचे काम चालू आहे अश्या वेळी आपण सर्वानी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपण भारतीय म्हणून एकत्र राहिले पाहिजे. तसेच शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि आपण या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढले पाहिजे संविधान टिकले तरच या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे.
बाईक रॅलीच आयोजन पिंपरी चिंचवड शहराचे युवा नेते खालिद भाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी या रॅली मध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे , कार्याध्यक्ष नियाज देसाई, उपाध्यक्ष वसीम तांबोळी,युवा उपाध्यक्ष असिफ तांबोळी, सद्दाम हुसेन, भोसरी उपाध्यक्ष अकिब शेख, फिरोज तांबोळी , सलीम पटेल , सोनू शेख , सोहेल मणियार व AIMIM पक्षाचे सदस्य उपस्थित होते.


