पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (YCM) रुग्णालयात उपचार घेत असलेला एक रुग्ण जीबीएस मुळे मृत्यूमुखी पडला आहे. पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय युवकाचा गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) मुळे मृत्यू झाला आहे. या आजारानंतर रुग्णाला न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. (PCMC)
या रुग्णाचे २१ जानेवारी रोजी GBS चे निदान झाले होते.
त्याच्यावर संत तुकाराम नगर येथील YCM रुग्णालयात उपचार सुरू होते. GBS सह न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. नेमका मृत्यूचा कारण व उपचारांमध्ये काही त्रुटी होत्या का, याचा तपास करण्यासाठी YCM रुग्णालयाने समिती स्थापन केली आहे.
समितीच्या अहवालानुसार, न्यूमोनियामुळे श्वसनाचा त्रास निर्माण झाला, ज्यामुळे आधीच GBS ने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला.
दरम्यान, पिंपरी येथील ६७ वर्षीय महिलेचा देखील २५ जानेवारी रोजी न्यूमोनिया आणि श्वसन विकारामुळे मृत्यू झाला. ती मागील दोन अडीच महिने उपचार घेत होती. वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले की तिचा मृत्यू GBS मुळे झालेला नाही.
सध्या शहरात GBS चे एकूण १३ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी काही बरे झाले असून काहींचा उपचार सुरू आहे.
PCMC
मृत युवक कॅब ड्रायव्हर होता, त्यामुळे प्रवासादरम्यान त्याला आजाराचा संसर्ग झाला असावा, असा आरोग्य विभागाचा संशय आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कोणतेही दूषित विषाणू आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी, युवकाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात दुसरा बळी
- Advertisement -