Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : भरारी पथकातील महिलांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – ॲड. सचिन भोसले

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (pcmc) वतीने अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील महिलांनी सोमवारी दापोडी येथे अतिक्रमण कारवाई करीत असताना एका भाजी विक्रेत्या महिलेला अमानुषपणे मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या भरारी पथकातील या महिलांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे. pcmc

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने (pcmc) शहरातील अतिक्रमण रोखण्यासाठी व अतिक्रमण कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने भरारी पथक नेमले आहेत. pcmc news

ही भरारी पथके भ्रष्ट अधिकारी व पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर कारवाई करण्याचा स्टंट करतात. धन दांडग्यांचे व्यावसायिक अतिक्रमणे सोयीस्करपणे दुर्लक्षित करून पोटाची खळगी भरण्यासाठी हातगाडी व पथारी लावून चरितार्थ चालवणाऱ्या गोरगरिबांवर कारवाई करून त्यांच्या मालाची नासाडी केली जाते. pcmc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. शहरात पार्किंगची व वाहतुकीची गंभीर समस्या आहे. पुणे मुंबई महामार्ग व शहरातील अनेक भागात व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंग क्षेत्रात बेकायदेशीर हॉटेल्स आणि इतर आस्थापना राजरोसपणे सुरू आहेत. pcmc

---Advertisement---

मागील अडीच वर्षात या भरारी पथकाने अशा किती हॉटेलवर व बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई केली आहे हा संशोधनाचा भाग आहे.

धनदांडग्या व्यवसायिकांना व विकसकांना पाठीशी घालून गोरगरीब जनतेवर अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाचा पिंपरी चिंचवड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचेही शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

मोठी बातमी : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ST पास मिळणार शाळेतच!

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles