Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : गुन्हे दाखल करा, अन्यथा कार्यक्रम उधळू – शिवप्रेमी संघटना आक्रमक..

पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावर तसेच जुलमी, अन्यायी, अत्याचारी, धर्मांध, क्रूरकर्मा औरंगजेब बादशहा याचे गोडवे गाणाऱ्या आणि त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी या तिघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा शहरात येणाऱ्या मंत्र्यांचे कार्यक्रम उधळू असा इशारा छावाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी दिला. (PCMC)

छत्रपती शिवराय, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊच्या महाराष्ट्रात जुलमी अन्याय अत्याचारी धर्मांध औरंगजेब, अफजलखानाचे गोडवे व उदातीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. या वक्तव्याबद्दल आमदार अबू आझमी यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची रवानगी जेलमध्ये करावी.

तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करणारे सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, तसेच नागपूरचे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याशी मोबाईलवरुन संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या जेम्स लेन याच्या पुस्तकाचे समर्थन केले, ज्या पुस्तकावर बंदी आहे.

---Advertisement---

मराठा ब्राह्मण या समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केले आहेत. अशा वक्तव्यांना कायमचा आळा घालायचा असेल तर सोलापूरकर,कोरटकर अबू आजमी यांच्या वर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.अशा बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने अबू आजमी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. (PCMC)

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,मारुती भापकर,प्रकाश जाधव, नरेंद्र बनसोडे, सिद्दीक शेख, यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी छावा संघटनेचे
धनाजी येळकर पाटील, वैभव जाधव, राजन नायर, विष्णू बिरादार, गणेश सरकटे, अमित मोरे, इस्माईल शेख, रावसाहेब गंगाधरे, सुशांत जाधव, शादाब शेख, प्रदीप पवार, मीरा कदम, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, किशोर अट्टर्गेकर, शितल घरत, वृषाली साठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles