Wednesday, February 12, 2025

PCMC : प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते

पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.१७. –
पद्मविभूषण असा महत्त्वाचा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार बहुमान प्राप्त , माजी मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार मा शरदचंद्र पवार साहेब यांचेवर आकस बुद्धीने बदनामी करणारे व दोन समाजात तेढ निर्माण करून त्यांची व तरुणांची माथी भडकावून हिंसक कारवाया करायला लावणारे, देश विघातक कृत्य करीत आहेत म्हणून प्रा. नामदेवराव जाधव यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन ,कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पोलीस आयुक्त व रणजीत सावंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी यांना देण्यात आले यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,किरण साडेकर, नाना कसबे, उमेश डोर्ले उपस्थित होते . तक्रार निवेदनात म्हटले आहे की युट्युब, फेसबुक वर प्रा. नामदेवराव जाधव यांचे त्यांचे व्हिडिओ पाहिले असता मराठा समाजाला व मराठा तरुणांना चेतावणी देऊन शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या सर्व व्हिडिओ वर पोस्ट पाहिले असता मुंबई तक, व्हायरल बातमी या चॅनेलवर देखील त्यांची मुलाखत पाहिली असता प्रा. नामदेवराव जाधव हे स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे वंशज असल्याचे सांगून स्वतःबद्दल प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून जनतेची दिशाभूल करीत आहेत असे त्यांचेच वंशज गोपाळराजे जाधव यांनी व्हिडिओद्वारे नमूद केलेले आहे.

मराठ्यांची लाखो मुले बेरोजगार आहेत त्याला कारण हा रातोरात झालेला निर्णय आहे या निर्णयाला शरद पवार जबाबदार आहेत कारण ते मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी 14 टक्के वरून 27 टक्के वर आरक्षण नेलं मात्र मराठ्यांना डावलण्यात आलं आणि डावलून तेली आणि माळी या दोन जातीचा समावेश केला पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी हे केले आणि मराठ्यांचे भविष्य गाडले असे मत त्यांनी नमूद केले आहे. अशाप्रकारे अजून बरीच खोटी व मराठा समाजाची व तरुणांची माथी भडकावणारे विधाने करून शरद चंद्र पवार साहेब यांच्या विषयी अत्यंत खोटी, दिशाभूल करणारी व बिनबुडाची माहिती पसरवण्याचे काम प्रा नामदेवराव जाधव करीत आहेत .

मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात काही महिन्यापासून मांडला जात आहे त्याद्वारे अनेक आंदोलने मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी कित्येक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच काही तरुण मुलानी बसेस आणि गाड्या जाळलेल्या आहेत, जाळपोळी झालेल्या आहेत . त्यामुळे महाराष्ट्रात भीतीदायक वातावरण निर्माण झालेले असताना या घटनांना प्रा. नामदेवराव जाधव यांच्यासारखे लोक जबाबदार आहेत. मराठी तरुणांची माती भडकवण्याचे काम यांच्या माध्यमातून होत आहे. शरद पवारामुळे मराठा आरक्षण गेलं असे म्हटल्यामुळे ओबीसी व मराठा या दोन जाती समूहामध्ये गैरसमज पासून पसरवून जातिय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे त्यामुळे दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या बदनामीमुळे तरुण वर्गात संतांची लाट निर्माण झालेली आहे. म्हणून प्रा नामदेवराव जाधव यांच्यावरती त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या त्यांना कडक शासन होणे गरजेचे आहे. म्हणून भा.द.वि .कलम 117 153,153 अ,153 ब, 295 अ 298,499,500,503,504,505 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा प्रवृत्तीना वेळीच आळा घालावा अशी मागणी नखाते यांनी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles