Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : फिडेल साॅफ्टटेकची उलाढाल १०० कोटींच्या दिशेने – सुनील कुलकर्णी

फिडेल साॅफ्टटेकचा ११ टक्के लाभांश जाहीर (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : फिडेल सॉफ्टटेकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच मोठी भरारी घेत विश्वासार्हता निर्माण केली आहे. येत्या काळात कंपनीची आर्थिक उलाढाल शंभर कोटींच्या पुढे जाईल, असा विश्वास फिडेल साॅफ्टटेक लि. चे अध्यक्ष आणि विशेष संचालक सुनील कुलकर्णी यांनी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. (PCMC)

फिडेल साॅफ्टटेक लि. च्या सभासदांची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यावेळी कुलकर्णी यांनी कंपनीच्या प्रगतीची आणि कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच पुढील वाटचाल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आव्हाने या विषयावर माहिती दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रदीप धरणे, डॉ. अपूर्वा जोशी तसेच सभासद उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, फिडेल साॅफ्टटेकने विविध शैक्षणिक, कौशल्य विकास, स्टार्टअप साहाय्यपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कंपनीची महसुली वाढ, नफा, प्रमुख आर्थिक निर्देशकांवर तपशीलवार अहवाल सादर केला. सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. एआय, एडीएएस आणि नवीन तंत्रज्ञानांच्या एकत्र येण्याने भाषा व तंत्रज्ञान सल्लामसलत, या क्षेत्रांचे एकत्रीकरण. फिडेलने या क्षेत्रात स्वतःचे चांगले स्थान निर्माण केले आहे. (PCMC)

कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने जपान समवेत आहे. भाषा, तंत्रज्ञान आणि संवाद हे घटक या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असल्याने बाजारातील उपलब्धता वाढत आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles