शिक्षण हा धंदा नाही,मोफत शिक्षण सरकारची जबाबदारी ही अरविंद केजरवाल यांची ब्लू प्रिंट आहे
आप चा पालकांशी शैक्षणिक समस्यांवर संवाद कार्यक्रम
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : आम आदमी पार्टी च्या वतीने पालकांच्या शालेय शिक्षण संदर्भातील समस्या समजून घेण्यासाठी पालकांशी संवाद (Dialogue With Parents) आकुर्डी येथील कार्यालयात दि.१० मार्च रोजी पालकांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले होते.
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला आप महाराष्ट्रचे सहसचिव सागर पाटील, माजी शिक्षण अधिकारी आर.जे.जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परदेशी, ज्ञानेश्वर ननावरे यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षणाच्या खाजगीकरणास राज्यकर्ते जबाबदार
मागील चाळीस वर्षात राजकीय सत्ताधारी मंडळींनी खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या, आर्थिक मागास, बऱ्यापैकी उत्पन्न असलेल्या मध्यम वर्गातील पालकांना डोनेशन व भरमसाठ शुल्क देवून नर्सरी ते पदवी पर्यंत मुलांना शिकवण्यासाठी पैसा मोजावा लागत आहे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरात किमान ६० हजार रु बालकांना शाळा प्रवेशासाठी मोजावे लागत आहेत. शहरातील व राज्यातील धंदेवाईक शिक्षण संस्था शिक्षण सम्राट झाल्या आहेत.
दिल्ली, केरळ सारखी मॉडेल स्कूल आणि मोफत शिक्षण प्रवेश सुविधा लोककल्याणकारी आहेत. युरोप, चीन मध्ये सरकारी शाळा व विद्यापीठातून अतिशय माफक दरात शिक्षण दिले जाते, मात्र आपल्या देशात व शहरात जल्लोष शिक्षणाच्या नावाने इव्हेंट सुरू आहेत. असे आम आदमी पार्टी पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
सरकारची भांडवल गुंतवणूक शाळा महाविद्यालयात नाही, कारण शिक्षण सम्राट आलटून पालटून सत्तेमध्ये असतात, येत्या काही वर्षात शिक्षणापासून वंचित मुलामुलींना त्यांच्या पालकांना फी दरवाढ, वाहतूकीच्या नावाखाली होणारी लूट, गणवेश आणि इतर साहित्य खरेदी साठी शाळे कडून होणारी सक्ती, पी.टी.ए समिती, आर. टी. ई (शिक्षण हक्क कायदा) आणि अनेक समस्यांमुळे शिक्षण घेणे शक्य होणार नाही. अनेक विषया संदर्भात पालकांनी मुद्दे मांडले. आकुर्डी येथे आम आदमी पार्टीच्या पालक संवाद चर्चासत्रात मांडले, अशी माहिती चेतन बेंद्रे यांनी दिली.
माजी शिक्षण अधिकारी आर.जे.जाधव यांनी शिक्षण व्यवस्थेवर मार्गदर्शन करत असताना पालकांच्या समस्या गंभीर आहेत आणि सरकार ने त्याच्यावर त्वरित समाधान काढले पाहिजे असे मत व्यक्त केले. देश आणि राज्यपातळीवर सार्वत्रिक मोफत शिक्षण व खाजगी शिक्षण संस्था याबाबत साविधनिक व कायदेशीर मार्गाने मोफत शिक्षण विद्यार्थी हक्क चळवळ उभी करावी लागणार आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परदेशी यांनी समाजामधल्या समस्या समजून घेण्यासाठी असे संवादाचे कार्यक्रम घेण्याची गरज सध्या अधिक गरज आहे असे मत व्यक्त केले.
पालकांच्या समस्या आणि सरकारची भूमिका याच्या वर प्रश्न चिन्ह शज्ञानेश्वर ननावरे यांनी उपस्थित केले.
महाराष्ट्रातील शाळांना लाजवेल अशा दिल्ली आणि पंजाब मधील सरकारी शाळा अरविंद केजरीवाल यांनी तयार केल्या आहेत, त्यामुळे पालकांच्या विविध शैक्षणिक समस्यांचे निराकरण झाले आहे. महाराष्ट्र मध्ये सुद्धा हे बदल घडवण्यासाठी आप ची गरज आहे, असे आप महाराष्ट्र चे सहसचिव सागर पाटील म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी मुख्याध्यापिका अरुणा सिलम यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप सूर्यवंशी, मारुती वाघमारे, पूनम गीते, भावसार ताई, कोरे ताई, राजेंद्र शिंदे, सुनिल बोडरे, मोहसीन गडकरी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन चेतन बेंद्रे यांनी केले.