शिवसेनेच्या विजय गुप्तांची महापालिका आयुक्तांकडे मागणी (PCMC)
पिंपरी चिंचवड – संयुक्त शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार गजानन बाबर याचं अफाट कार्य पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना परिचितच आहे. गजानन बाबर यांना एक अभ्यासू , लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. त्याचं शहराच्या जडणघडणीत मोठ योगदान आहे. स्व. गजानन बाबर यांचा काळभोरनगर अथवा संभाजीनगर परिसरात अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अथवा त्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (PCMC)
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. एमआयडीसीत काम करण्यासाठी राज्यातून मोठा कामगार वर्ग इथे लोटला होता. काबाडकष्ट करून अनेक कामगारांनी इथ स्वतःच घर बांधल. पुढे जाऊन त्यांच्यापुढे मोठ्या समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी गजानन बाबर यांनी लोकचळवळ उभी केली. त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. नागरिकांच्या पाठींब्यामुळे पुढे जाऊन ते काळभोरनगर प्रभागातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर हवेली तालुक्यातून ते दोन वेळा आमदार तर, मावळ मतदार संघातून ते शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून निवडून आले.
नागरिकांना स्वतःचा हक्क मिळवून देण्यासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत झटत राहिले. भविष्यात त्यांचे विचार पुढील पिढीला देखील मार्गदर्शक व्हावेत, यासाठी महापालिकेने स्व. गजानन बाबर यांचा काळभोरनगर किंवा संभाजीनगर परिसरात अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अथवा त्यासाठी जागा उपलब्ध करावी, असे या निवेदनात गुप्ता यांनी म्हटले आहे (PCMC)
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांचा शहरात अर्धाकृती पुतळा उभारा..
---Advertisement---
- Advertisement -