पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – रुपीनगर तळवडे येथील शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे याही वर्षी किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. (PCMC)
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एखाद्या किल्ल्यावर पार पाडला जातो. यावर्षी मावळ तालुक्यातील किल्ले कोरीगड येथे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. स्पर्धेतील सर्व सहभागी बाल मावळ्यांना किल्ले कोरीगडाची सफर घडवण्यात आली.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/02/1000684545-1024x478.jpg)
अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी किल्ल्याचे महत्त्व, त्याची बांधणी, इतिहास, किल्ल्याचे भौगोलिक स्थान, आताची परिस्थिती सर्वांना समजावून सांगितली. “आपण सहल म्हणून किल्ल्यावर आलो नाही, तर सर्वांना शिवरायांचा इतिहास कळावा, इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण येथे आळे आहे, कारण जे आपला इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाही” असे मत अमोल भालेकर यांनी व्यक्त केले. (PCMC)
शंभरहून अधिक मुलामुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. किल्ल्याच्या पायथ्याशी बक्षीस वितरण समारंभ पार पाडला. त्यानंतर सर्वांनी वन भोजनाचा आनंद घेतला.