डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप तर्फे अभिवादन PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पूर्वी, जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवाना लागत असे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान आणि एक निशान (ध्वज) साठी लढा देत काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा लढा आणि बलिदानाचे आपण सगळे कायम ऋणी आहोत, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. pcmc
पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, रवींद्र देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, तेजस्विनी कदम, प्रकाश जवळकर, राकेश नायर, समीर जावळकर, प्रकाश लोहार, शिवदास हांडे, सीमा चव्हाण, आकाश भारती, मनोजकुमार मारकड, संतोष भालेराव, भारत मदने, विजय शिनकर, प्रदीप नेहते, कुणाल इंगळे, प्रदीप ढाके, गणेश जावळे, चंद्रकांत ढाके, अमेय देशपांडे, संजय परळीकर, भूषण जोशी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. pcmc news
शंकर जगताप म्हणाले, “अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आज बलिदान दिन आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यघटना लागू झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने कलम ३७० जोडून राष्ट्रीय अखंडतेला गंभीर धक्का देण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेत ३७० लागू केला. तत्कालीन सरकारचा हा हेतू लक्षात घेऊन उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून देशसेवा करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. pcmc
त्यांनी भारतीय जनसंघाच्या हजारो कार्यकर्त्यांसह काश्मीर सत्याग्रहासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न आज साकार झाले. सत्तेचा मूळ हेतू अधिकार गाजवणे हा नसून देशबांधणीच्या कार्यासाठी समर्पित भावनेने काम करणे हा आहे, असे मानणारे डॉ. मुखर्जी हे एकमेवाद्वितीय नेते होते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे त्यांचे तत्वज्ञान आणि भारताच्या मूळ संस्कृतीचा आधार घेऊन धोरणे आखण्याचे त्यांचे विचार आपल्यासाठी कायम मार्गदर्शक ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.”
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय