डॉ. माया भालेराव यांना प्रथमच महिला अध्यक्ष पदाचा मान
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इंडियन मेडिकल असोसएशनच्या पिंपरी चिंचवड (pcmc) भोसरी शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. माया भालेराव तर सचिवपदी डॉ सारिका लोणकर व तर खजिनदार म्हणून डॉ. मनिषा डोइफोडे यांनी सुत्रे स्विकारली. चिंचवड येथील एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा संपन्न झाला. pcmc news
यावेळी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे व राज्य आयएमए (IMA) उपाध्यक्ष डॉ वैजयंती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विश्वस्त डॉ दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, मावळते अध्यक्ष डॉ. सुशील मुथियान, डॉ. सुहास माटे, डॉ. विजय सातव, डॉ. प्रभाकर बुरूटे,डॉ माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही संघटना 10 वर्षापासून कार्यरत आहे. यावेळी वेगवेगळया विषयावर परिषद व कार्यशाळा, अवयवदान, टीबी जनजागृती, महिला स्वास्थ्य उपक्रम, आओ गांव चले उपक्रम अशा अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. भालेराव यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुधीर भालेराव आणि डॉ. सुहास लुंकड यांनी केले.
नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-
डॉ. माया भालेराव – अध्यक्ष
डॉ. सारिका लोणकर – सचिव
डॉ. मनिषा डोईफोडे खजिनदार
डॉ. सुधीर भालेराव – नियोजित अध्यक्ष
डॉ. ललित कुमार धोका – उपाध्यक्ष
डॉ. अनिरुद्ध टोणगावकर – उपाध्यक्ष
डॉ. सुमीत लाड- ( संपादक – स्पंदन )
डॉ. ज्योती डेकाते – महिला डॉक्टर चेअरमन
डॉ. सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ. दीपाली टोणगावकर (सह खजिनदार )
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. वर्षा कुऱ्हाडे यांनी तर आभार डॉ. सारिका लोणकर यांनी मानले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भोसरीच्या अध्यक्षपदी डॉ. माया भालेराव
---Advertisement---
- Advertisement -