पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. अरविंद बी. तेलंग इन्स्टिटयूटला राष्ट्रीय मुल्याकंन व मानांकन परिषदेने (नॅक)भेट देऊन तपासणी केली. दोन दिवस झालेल्या या तपासणी समितीत नॅक समितीचे चेअरमन डॉ. देवी प्रसाद मिश्रा, सदस्य समन्वयक डॉ. अजय वाघ व सदस्य डॉ. शकुंतला सॅम्युएल्सन यांचा समावेश होता. pcmc
दोन दिवस झालेल्या दुसऱ्या तपासणीत राष्ट्रीय मुल्याकंन व मानांकन परिषदेमध्ये (नॅक) असलेल्या अधिकाऱ्यांकडून स्वयंपरीक्षण अहवालानुसार महाविद्यालयाचे कसून मूल्यांकन करण्यात आले.त्यांनी महाविद्यातील सर्व विभागांच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती व कागदपत्रे तपासणी करून कामकाजाची पाहणी करून केलेल्या कामाची प्रशंसा केली. यामध्ये विद्यार्थ्यांना परिणाम आधारित शिक्षण दिले जाते का यासाठी कठोर तपासणी करण्यात आली. pcmc
याप्रसंगी समितीने महाविद्यालयातील सर्व विषयांची विभागनिहाय पाहणी केली तसेच पायाभूत सुविधा, ग्रंथालय, आयसीटी सुविधा, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभाग आदींची पाहणी केली.
या समितीसाठी कॅम्प एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष वालचंद डी. संचेती, सचिव बाबुराव वि. जावळेकर , खजिनदार सुभाष डी. अगरवाल, सदस्य इम्तियाज मुल्ला, सदस्य डॉ. मिलिंद तेलंग, प्राचार्य डॉ. अजयकुमार राय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे डीन डॉ. प्रमोद पाटील, पुण्यातील अमेनोरा द फर्न या हॉटेल्सचे महाव्यवस्थापक अमित कुमार शर्मा तसेच द कॉनरॉड या हॉटेलचे महाव्यवस्थापक अभिषेक सहाय यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपारिक पोशाख परिधान करून सर्व सदस्यांचे स्वागत केले तसेच पारंपारिक पध्दतीचे जेवण बनविले. या सगळ्याचे नॅक समितीने तसेच उपस्थित सर्व सदस्यांनी खूप कौतुक केले. नॅक समितीचे चेअरपर्सन यांनी आपल्या एक्सिट मीटिंग मध्ये महाविद्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. pcmc
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण देणारे डॉ. अरविंद बी. तेलंग हे महाविद्यालय पुणे जिल्ह्यात सर्व सोयी सुविधायुक्त चांगले ज्ञान आणि कौशल्य मिळविण्यासाठी समग्र शिक्षण पद्धती असलेले तसेच उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, १००% प्लेसमेंट रेकार्ड, १००% निकाल असलेले एक चांगले महाविद्यालय आहे असेही ते म्हणाले. त्यांनी महाविद्यालयाला तसेच विद्यार्थ्यांना पुढील चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. pcmc
एक्सिट मीटिंगच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे वेळोवेळी सहकार्य व बहुमूल्य मार्गदर्शन या नॅक समितीसाठी मिळाले असल्याचे सांगून आभार व्यक्त केले.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!