प्रा. दीपक जाधव यांचा विकास अनाथ आश्रम येथे उपक्रम (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – विपला फाउंडेशन संचालित सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे समन्वयक प्रा. दीपक जाधव सर यांनी आपला वाढदिवस विकास अनाथ आश्रम, सोनावणे वस्ती चिखली येथील अनाथ मुलांसमवेत त्यांना फळे, खाऊ, आणि अन्नधान्य वाटप करून साजरा केला. (PCMC)
यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सलीम सय्यद, माजी उपाध्यक्ष दिलीप पेटकर उपस्थित होते.
या आश्रमात एकूण ५६ मुलांचे संगोपन केले जाते.
यावेळी प्रा. दीपक जाधव सर म्हणाले की, अनाथ मुलांचे संगोपन करून त्यांना वय वर्षे १८ पर्यंत सर्व आवश्यक सुविधा, शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हे मानवतावादी कार्य आहे, संचालक माऊली हारकळ यांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आमच्या मित्र मंडळी आणि कौटुंबिक सदस्यांचे पुढील वाढदिवस येथेच साजरे करू. यावेळी प्राध्यापिका वैशाली गायकवाड व त्यांची मुले देव-दर्शन उपस्थित होते.
जनतेला आव्हान करतो की त्यांनी त्यांचे वाढदिवस असेच अनाथ आश्रमांना भेट देऊन साजरे करावे. असे प्रा. दीपक जाधव म्हणाले.
PCMC : वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळे,खाऊ आणि अन्नधान्य वाटप
- Advertisement -