पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. (PCMC)
सोमवारी रात्री जन्मोत्सवाचे प्रवचन ह. भ. प. शंकर महाराज चोपडे यांनी केले. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी जन्माचा पाळणा म्हणून सुंठवड्याचे वाटप केले.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता ह भ. प. शंकर महाराज चोपडे यांचे काल्याचे किर्तन होऊन गोपाळकाला करून बाळ गोपाळांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर आरती होऊन प्रसादाची वाटप करण्यात आले. (PCMC)
सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले.
राजू गुणवंत, दीपक बिरादार, राजेंद्र पाटील, अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे, शोभा नलगे, केंजळे काका, राजेंद्र पाटील, नीलिमा भंगाळे, मीरा बिरादार, रीना शिंदे, भगत काका, मेघराज बागी, गीतांजली पाटील यांनी सहकार्य केले.