पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – नवी सांगवीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या मैदानातून ‘ह’ प्रभाग आरोग्य विभागाच्या व बेसिक टीमच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)
नवी सांगतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या मैदानातून रॅलीचे आयोजन केले होते ह क्षेत्रिय अधिकारी पूजा दुधनाळे यांनी उपस्थितांना पर्यावरणाची व आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व सांगितले. सायकल मुळे प्रदूषण कमी होऊन आरोग्य निरोगी राहते आरोग्यासाठी सायकल चालण्याचा सल्ला त्यांनी दिला.
आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे म्हणाल्या कि,आजचे पर्यावरण रक्षण, म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय हे प्रत्येकाला समजलं जावं, प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी इतर भेटवस्तू न देता झाडे देण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. (PCMC)

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीची शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर झाडे लावा, वृक्षतोड टाळा, प्रदूषण टाळा अशा संदेश लिहिलेला शर्ट घालून कावळा म्हणतो, काव काव, एक तरी झाड लाव लाव अशा घोषणा ते रॅलीमध्ये देत होते.
ह प्रभाग क्षत्रिय अधिकारी पूजा दूधनाळे यांच्या हस्ते मानवी हक्क संरक्षण जागृती शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, इंडो एथलेंटिक सोसायटीचे महेश रसाळ व पर्यावरण प्रेमी संघटना यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. (PCMC)
यावेळी ह प्रभाग क्षेत्रिय अधिकारी पूजा दुधनाळे, आरोग्य सहाय्यक अंकुश झिंटे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, सचिन तुपे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, ब्रंँड अँबेसिडर आदिती निकम, इंडो एथलेंटिक सोसायटीचे महेश रसाळ, राष्ट्रीय खेळाडू शौर्य रसाळ, सामाजिक कार्यकर्ते सखाराम रेडेकर, पिंटू जवळकर, अतुल पाटील, गजानन खैरे, अँड पंजाब इंगळे, श्रीराम डुकरे, पवन रंधे ,दिपा गराडे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)
उपस्थित नागरिकांना जयश्री आरणे यांनी पर्यावरणाची शपथ दिली आभार अंकुश जिठे यांनी मानले राष्ट्रगीताने राजमाता जिजाऊ उद्यान येथे सांगता झाली.