नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमीचा वापर करण्याचे आवाहन (PCMC)
पिंपरी चिंचवड – काळेवाडी पुलाजवळील त्रिलोक स्मशानभूमीमधील डिझेल शवदाहिनीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या ठिकाणी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे सहा महिने कालावधी लागणार असल्याने सदर शवदाहिनी या कालावधीत बंद राहणार आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संजय खाबडे यांनी दिली आहे. (PCMC)
डिझेल शवदाहिनीऐवजी गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामामुळे प्रदूषणास आळा बसणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी ऐवजी नूतनीकरणाच्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमीचा वापर करावा, असे आवाहन विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
PCMC : काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीतील शवदाहिनी नूतनीकरणाच्या कामामुळे राहणार बंद
- Advertisement -