पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कॉपीमुक्त अभियान सन फेब्रुवारी 2025 च्या अनुषगाने महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत व माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत. (PCMC)
या निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व शिक्षण मंडळ यांच्याकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा हद्दीतील परीक्षा केंद्रांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी मा. सहाय्यक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग व मा. शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग यांचे नियत्रंणाखाली पाच भरारी पथकाची नेमणुक करण्यात आलेली आहे.
सदर भरारी पथकांमार्फत मनपा हद्दीतील संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नये यांची दक्षता घेतली जाणार आहे. पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये एकुण एच.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता एकुण ३३ परीक्षाकेंद्रे असुन २५७०० विदयार्थी व एस.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता एकुण ४८ परीक्षाकेंद्रे असुन २८५०० विदयार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड मनपा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या १८ माध्यमिक विदयालयातील मराठी माध्यमाचे २३०० विदयार्थी व उर्दू माध्यमाचे ५०० असे एकुण २८०० विदयार्थी एस.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता प्रविष्ठ झालेले आहेत. सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्राध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत. (PCMC)
ज्या केंद्रावरती गैरप्रकार घडतील किंवा गैरप्रकाराला उद्युक्त करणारे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र Prevention of malpractices act. 1982 अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
PCMC : पिंपरी चिंचवड शहरात कॉपीमुक्त अभियान राबविणार -आयुक्त शेखर सिंह
- Advertisement -