पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : सनातन धर्म हा प्राचीन आहे. इंडोनेशियासारख्या देशात भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे , मात्र आपल्या देशात काही समाजकंटक सनातन धर्माचे उच्चाटनासाठी नकारात्मक विचार पसरवीत आहे.या त्यांच्या दुष्कृत्याविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे.असे उदगार गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्ले यांनी काढले. निगडी येथील नायर सर्व्हिस सोसायटीच्या (एनएसएस) वतीने ओणम निमित्ताने आयोजित सांस्कृतिक व विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी सीरम इंस्टीट्यूटचे संचालक पी.सी नंबीयार, अयोकी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष गणेश कुमार, नायर सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक टीपीसी नायर, अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव शशी कुमार, खजिनदार पी रवीन्द्रन नायर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर नायर सर्व्हिस सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथन नायर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच मल्याळी बांधवांनी मल्याळी हिंदी गाणी, पारंपरिक नृत्य सादर केले.
राज्यपाल श्री श्रीधरन पिल्लई पुढे म्हणाले कि, पिंपरी चिंचवडमधील एनएसएस स्थापनेचे कौतुक केले. निगडी श्रीकृष्ण मंदिरात दर्शन मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी एनएनएस च्या 100 वर्षांच्या इतिहासाचा सांगितला. नायर समाजाच्याच नव्हे तर सर्व समुदायाच्या एकता आणि उन्नतीसाठी कार्य करीत आहे. त्यांनी G20 च्या जागतिक मंचावर भारताच्या नेतृत्वाचा उल्लेख करित G20 चे घोषवाक्य आहे “वसुदैव कुटुंबकम” – एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. इंडोनेशिया या मुस्लीम बहुल देशातही पाळल्या जाणार्या भारतीय संस्कृतीच्या महानतेचे उदाहरण देत आहे. इंडोनेशियन व्यक्ती आपली मुळ संस्कृती विसरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या सर्व प्रयत्नांचा आपण प्रतिकार केला पाहिजे.
चटम्बी स्वामीगल, मन्नत पद्नाभन आचार्य आणि श्री नारायण गुरुदेवन या सर्वांनी केवळ सर्वांच्या ऐक्यासाठी कार्य केले. गणेशकुमार म्हणाले कि, एनएसएस ही केवळ नायरची संस्था नसून ती सर्व समाजाला एकत्रित आणणारी संस्था आहे. पी. सी. नांबियार म्हणाले कि, एनएसएस सनातन धर्माचे पालन करत आहे. सर्वांना सनातन धर्माचे पालन करण्याचे बळ मिळो ही प्रार्थना. कार्यक्रमाचे रविंद्रन नायर यांनी आभार मानले.


