पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.०५-केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी,कष्टकरी,कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे.कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी,कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे.
रविवारी (दि. ०४ फेब्रु. २०२४) पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रशिद अत्तार,युवा आघाडी संघटक मंत्री राहुल शिंपले, सदस्य अनिल जाधव,अरबाज सय्यद,आवेज सय्यद,ऋषिकेश भोसले,प्रतिक अधिक,अवधूत गोडसे,विशाल शिंदे,मैनुद्दीन शेख,चिराग आभार, अजीम तांबोळी,प्रतीक घोले,योगेश गायकवाड, शिवा पाटील,संतोष सोनसाळे,पियुष वाढणे,हर्ष प्रजापती,प्रतिक प्रजापती,सोमेश पवार,समद खान, पंकज मुजुमदार,विनय शेलार,सोमेश्वर खरात, वेदांत,वैभव सानप,लक्ष्मण अधिक,सैफ खान,राजेश वाल्मिकी,यश झेंडे, मुदस्सर करजळकर,सैद खान,सौरभ रणदिवे,अयान सय्यद, जनशक्ति पार्टीचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष नसिम जसिम शेख,ज्योति सूर्यवंशी,दिव्या पवार,राणी कडलक,स्वाती काळे,रोहिणी शिंदे,इंदुबाई जगताप, रेश्मा झेंडे,स्नेहा काळे,ज्योति गालफाडे,छाया शेजवळ,कुसुम कडलक,नितू पवार,लक्ष्मी पवार, उषा गायकवाड,शशिकला कदम,कुसुम शिंगाडे, साक्षी कडलक,रमा शेजवळ,सीमा लोंढे,सुनीता जगताप,अनिल वाघमारे,जावेद शेख,लालू अरसद, ज्ञानेश्वर सदाफुले आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ.कैलास कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्ष प्रवेश केला.त्यांचे स्वागत माजी गृह राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे आणि पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट,माजी नगरसेवक बाबू नायर, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप,माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, सरचिटणीस अनुप शर्मा, सेवादलाचे प्रा. किरण खाजेकर, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर नाणेकर, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे,अबूबकर लांडगे,जॉर्ज म्यथू,उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील, वाहाब शेख, मिलिंद फडतरे, बाबा शेख,हरिश डोळस,विष्णु पाटील,दिपक श्रीवास्तव,सतिश नायर,निर्मला खैरे,सिमा यादव, मेमुना शेख,सद्दाम पठाण,वसंत वावरे, अॅड. अनिकेत रसाळ,धनाजी गावडे, शंकर ढोरे, आकाश शिंदे,भीमराव जाधव उपस्थित होते.
यावेळी काँगेस शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष सर्व सामान्य नागरीक व कष्टकरी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास कदम यांनी यावेळी दिला.
PCMC:काँग्रेस पक्ष सर्व सामान्य नागरीक व कष्टकरी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल- माजी गृह राज्यमंत्री आमदार रमेश बागवे
- Advertisement -