Tuesday, February 11, 2025

PCMC: पिंपरी चिंचवड च्या विविध उपनगरात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला स्वच्छता मोहीम

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मनपा ह प्रभाग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरीच्या विविध भागामध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.पिंपरी चिंचवड मध्ये सफल स्वच्छता मोहिमेअंतर्गत हिंदुस्तान एंटीबायोटिक ग्राउंड ते संतोषी माता चौक,टेल्को रोड ते सेंचुरीएंका कंपनीपर्यंत तसेच पुणे मुंबई ग्रेट सेपरेटर रोड ते फुगेवाडी,कुंदन नगर कासारवाडी अशा वेगवेगळ्या भागांत गेल्या तीन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी बीव्हीजी संस्थेमार्फत संकलित केलेला कचरा उचलण्यात आला.


यावेळी शुभम उद्योग,बेसिक टीम तसेच तसेच इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेले तीन दिवस सखोल साफसफाई स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2024 बद्दलही नागरिकांमध्ये पत्रके वाटून,स्पीकरद्वारे,जनजागृती बेसिक टीमचे वार्ड इन्चार्ज श्रीराम डुकरे, विशाल मिठे,भूपेश बोडके अमन बिर्हाड,सुवास कारंडे करत होते,तर यावेळी क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे,गणेश देशपांडे आरोग्य अधिकारी सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, दीपक कोटियाना, नितीन तुपे,राजाराम राखपसारे,आण्णा जोगदंड सह अनेक सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांच पदाधिकारी स्वईच्छेने सहभागी होऊन स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles