Friday, March 14, 2025

PCMC : महात्मा फुलेनगर येथील ड्रेनेज लाईन तुंबून मैला रस्त्यावर पसरल्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : चिखली रोड येथील महात्मा फुलेनगर परिसरात रहिवाश्यांनी वारंवार सांगून महिना उलटूनही अद्याप त्या ड्रेनेज लाईनचे काम प्रशासनाने केलेले नाही. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही तर काय आहे.ड्रेनेज लाईन तुंबल्याने सर्व मैला रस्त्यावरून वाहत आहे. हौसिंग सोसायटीच्या मुख्य गेटच्या आत आणि समोरील रस्त्यावर ड्रेनेज लाईन तुमच्यामुळे सर्व मैला व घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.येथील रहिवाश्यांना एक ते दिड महिन्यापासून घाणीच्या साम्राज्याचा सामना करत आरोग्य धोक्यात घालावे लागत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now


परिसरात दुर्गंधी पसरली आहे व रस्ता अपुरा असून त्यावर मैला पसरल्याने अपघात होण्याची दाट शक्यताही निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत मग असे असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का मग प्रशासन या समस्येकडे का दुर्लक्ष करत आहे त्यामुळे महात्मा फुलेनगर मधील रहिवाशी व परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याची दखल कधी घेण्यात येईल कधी हे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पासून नागरिकांची सुटका होऊन मोकळा श्वास घ्यायला मिळेल या प्रतीक्षेत संतप्त नागरिक आहेत .

Related Articles

- Advertisement -

Latest Articles