स्थापत्य व आरोग्य विभाग, प्रभाग अधिकारी यांनी लक्ष द्यावे – मधुकर बच्चे यांची मागणी
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : प्रभाग 18 चिंचवडगाव मध्ये पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाण्याचे तळ्याचे स्वरूप आले त्यामुळे नागरिकांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत स्थापत्य विभागाने अभियंत्रिकी समतल व स्टॉर्म वॉटर निचरा व्यवस्थापन न हाताळता रस्त्यांचे सुशोभीकरण केले आहे.
अनेक ठिकाणी जनतेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्या पूर्वी पाण्याचा निचारा करणे पावसाळी ड्रेनेज (Storm water line) साफ करणे या गोष्टी प्राधान्याने करणे गरजेचे असते, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पहिल्याच पावसात केशवनगर, तानाजी नगर, लिंक रोड, पेट्रोल पम्प जवळ, दर्शन हॉल आदी अनेक ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. स्थापत्य व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणी निचरा व्यवस्थापन करावे अशी मागणी महावितरण समितीचे सदस्य भाजप शहर सचिव मधुकर बच्चे यांनी प्रभाग अधिकारी अमित पंडित यांचेकडे केली आहे.

नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन तुंबलेल्या पाण्याचा निचरा केला तरीही अनेक ठिकाणी अजूनही पाणी जमा आहे त्यामुळे त्या पाण्यात अनेक प्रकारचे किडे निर्माण होऊन रोग राई निर्माण होण्याची श्यक्यता आहे. विशेषतः शनी मंदिरात अनेक भाविक मोठ्या प्रमानात येतात बरोबर मंदिरासमोरच पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे.कानोडे हॉस्पिटल समोरच गेले 10 दिवस पाणी साचून त्यात किडे होऊन मोठी दुर्गंधी सुटली आहे या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना या पासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच जुने बी एस् एन् एल् ऑफिस च्या जागी शाळेतील मुलाचा क्लास आहे या ठिकाणी सुद्धा कित्येक दिवस पाणी साठून रोगराई पसरली आहे. अश्या अनेक ठिकाणी अडचणी असताना प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही. काही नागरिकांनी अधिकाऱ्यांना या अडचणी सांगूनही काही उपयोग झालेला नाही. वरील सर्व अडचणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित कार्यवाही करावी अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल, असे मधुकर बच्चे यांनी माध्यमांना सांगितले. मधुकर बच्चे स्वतः काल भर पावसात प्रभागात फिरून वरील वस्तुस्थिती पहिली व अनेक ठिकाणी पाणी निचारा करण्यास नागरिकाना मदत केली आहे.
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

