पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विशेष मुले शिक्षणासाठी ममता अंधः कल्याण केंद्र याठिकाणी आलेली आहेत, परिस्थितीमुळे किंवा वेळे अभावी आपल्या घरी जाऊ शकत नाही, राखी पौर्णिमा या पवित्र सणाची त्यांना उणीव भासू नये, राखी पौर्णिमेला आपण येथे राहिल्यामुळे आपल्या बहिणीची आठवण त्यांना येऊ नये किंवा ज्यांना बहीण नाही ही खंत त्यांच्या मनात राहू नये म्हणून बहीण भावाचे प्रेमाचे नाते म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या पदाधिकारी महिलांनी विशेष मुलांना राखी बांधून त्यांचा आनंद द्विगुणीत केल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
विशेष मुलांना राखी बांधून त्यांना गोड स्नेहभोजन देऊन त्यांचा रक्षाबंधनाचा सण आनंदी केला. आम्हालाही खूप आनंद झाला. खरं म्हणजे आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून विशेष मुलांना राखी बांधून आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न केल्याने आम्हाला खूप आनंद झाला, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला हि समाधान वाटले असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राखी पौर्णिमेचा सुत्य उपक्रम विशेष मुलांना राखी बांधण्याचा आमच्या संस्थेचा पहिलाच उपक्रम असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. आम्हाला अशा सामाजिक उपक्रम जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत, साहित्यिक सूर्यकांत मुळे या कार्यक्रमासाठी मदत केली आणि यापुढे ही अशा समाज उपयोगी उपक्रमास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिपक शहाणे हेही वेळोवेळी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, जेष्ट विचावंत, साहित्यिक सुर्यकांत मुळे आळंदी सचिव रवी भेंकी, मुरलीधर दळवी पदाधिकारी उपस्थित होते. तर शहर महिलाध्यक्षा मीना करांजणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सारंगी करंजावणे, श्रद्धा तोडकर, पल्लवी भेंकी, लिना रानडे, मिरा,देशमुख, वैशाली सपकाळ, साई भेंकी, या पदाधिकारी महिलांनी विशेष मुलांना औक्षण करून राखी बांधल्या, त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.