Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : फुटबॉलमध्ये करियरची संधी – फुटबॉलपटू जमी नाइट

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जमी नाइट् यांनी दिले पोदार शाळेच्या विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे

---Advertisement---

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जमी नाइट यांनी ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या १८०० विद्यार्थ्यांना फ्रीस्टाइल  फुटबॉलचे प्रात्यक्षिके करून दाखवत फुटबॉलचे धडे दिले. यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पुणे विभागाचे महाव्यवस्थापक डीएसजे फ्रांकलीन, नीता कुमार, ज्योती गाला, मुख्याध्यापक ॲग्नेल कार्व्हालो आदी मान्यवर विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होतो.

फुटबॉलपटू जमी  नाइट्स  म्हणाले की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी कौशल्य विकासामध्ये प्राविण्य मिळविण्याचे ठरवले होते. फुटबॉल हा अतिशय उत्तम खेळ आहे.ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो, तसेच या खेळामुळे आपले शारीरिक व मानसिक विचार तेच करण्याची करण्याची, सांघिक कौशल्य व यश-अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होते. फुटबॉल बरोबरच असे अनेक कौशल्य विकसित करण्यासाठी मुलांनी वयाचे भान न  ठेवता, तन्मयतेने व सातत्याने प्रयत्न करत राहिला तर यश नक्की प्राप्त होते. अतिउच्च यशाला गवसनी घालू शकतो. भारतातील मुलांनी फुटबॉल मध्ये करिअर करण्यासाठी आज मोठी संधी उपलब्ध आहे. आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी खूप वाव आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी फुटबॉल मध्ये करिअर करून आपल्या देशाचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करावा.असा संदेश फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जमी नाईट यांनी दिला.

---Advertisement---

यावेळी शाळेमध्ये जमी नाईट यांनी अराउंड द वर्ड, नेक्स्ट स्टॉल,साईड हेड स्टॉल ,क्रॉस ओवर, होप द वर्ल्ड,हमस्ट्रिंग कॅच,टो बाउन्स,स्लॅप, मीच अराउंड द वर्ड, टोझनी अराउंड द वर्ड या प्रकाराची प्रात्यक्षिके मुलांना यावेळी करून दाखवली. यावेळी गतीक देसले, वेदांत जगताप, अव्यान  फोंडेकर, हर्षद मधुरवार, शौर्य जमदाडे, गार्गी शाळिग्राम, तन्वी शिंदे, कुशल दाघिया, धैर्य सत्वरा आणि हंसराज मांजरे या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, तर सर्वज्ञ पाटील विराज शिंदे, आंद्रे पचाको, राजवीर राजपूत, मुग्धेश पाटील, सई वाळुंज, दिया जवखणी, इशा इनामदार आणि अरना गुरु या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रात्यक्षिके करून घेतली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापिका रचना सोनवणे, पर्यवेक्षक समीर इनामदार,क्रीडाशिक्षक समीर देशमुख, रुपेश महारनवर,साक्षी कडू, आनंद थोरात, संपदा केंदळे, प्रकाश पाटील, तनय खाबिया, महेश पाटील, निलेश बर्डे, केतन काटकर, संदीप कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. नेहा वशिष्ठ यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार आर सोनवणे यांनी मांडले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles