पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वात महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधात महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन घेऊन मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या तीन तोंडाच्या रावणाचं दहन करण्यात आले. (PCMC)
समाजसुधारकांची ,ब्रिटीशानी देखील अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा केली.
गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे.
परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच. (PCMC)
परंतु आज सरकार काय फक्त झोपा काढण्यासाठी आम्ही निवडून दिले का ? महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात अत्याचाराच्या अनेक घटना पुढे येतात, पण कोण बोलताय का ?प्रस्थापतांपैकी आमच्या चित्रा वाघ कुठे गायब झाले आहेत, त्याचा तपासच नाही आणि महिला आयोग महिला आयोग नसून खोक्यावर काम करणाऱ्या सरकारचं रिल्स आयोग झाले आहे. सगळं दिसत असून देखील कानावर हात डोळ्यावर हात आणि तोंडावर हात यांनी ठेवलेले आहेत.
मला उत्तर मागायचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना,उपमुख्यमंत्र्यांना आता तरी तुम्ही महिलांचा वापर बंद करा.
हो मतदानापुरता आमचा वापर करून कोणतेही आमिष दाखवून आम्ही गळाला लागणारे मासे नाही महिला आहोत, वेळ आल्यावर हे दाखवल्याशिवाय राहणार नाही.
आंदोलनासाठी शहराचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, शहराचे प्रवक्ते माधव पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, सचिन गायकवाड, प्रदेश सरचिटणीस प्रियंका बारसे, प्रदेश सचिव विश्रांती पाडाळे, व्यापार सेलच्या आशा भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, युवकचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, संतोष माळी, पंडित वाळके, राहुल धनवे, सुनील कस्पटे, सचिन निंबाळकर, तसेच कल्पना घाडगे, तायरा सय्यद , प्रिया देशमुख, कमरुनिसा शेख, कमल धाईंजे, राजश्री कारंडे, अनुसया वाडकर, मीना जाजोट,आशा सरडे, ज्योती येवले, पुष्पा जानराव, हसीना पटेल, कान्होपात्रा थोरात, स्नेहल दोगाडे, भवरी शिंदे, संगीता भोसले, प्रतीक्षा महानवर, अर्चना हजारे, मंदाकिनी भंगे, शकुंतला बालकुंदे, लता मकासरे, भारती नलावडे, अनिता भुरे, जयश्री झेंडे, कीर्ती तोरणे, महिमा जोंधळे या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.