Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सत्तेतील भागीदारांना खुश करणारा अर्थसंकल्प, सर्वात जास्त महसूल देणाऱ्या ...

PCMC : सत्तेतील भागीदारांना खुश करणारा अर्थसंकल्प, सर्वात जास्त महसूल देणाऱ्या महाराष्ट्राला काय मिळाले – मानव कांबळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024 – 25 चा अर्थसंकल्प आज लोकसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपले सत्तेतील महत्त्वाचे भागीदार असलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशला आणि नितीश कुमार यांच्या बिहारला विशेष आर्थिक पॅकेज देऊन इतर राज्यांवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होऊ शकतो. (PCMC)

देशातील सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता आल्याचे दिसते. देशातील सत्ता टिकून राहावी यासाठी केलेली ही कसरत असून, त्यामुळे केंद्रीय निधीचे समन्यायी वाटप झालेले नाही.

कृषी खर्चावर आर्थिक तरतूद वाढवणे आवश्यक होते परंतु सन 2019 पासूनची तरतूद 5.4% वरून 2024 मध्ये 3.15% इतकी कमी झालेली दिसून येते. यावरून शेतकरी ही सरकारची प्राथमिकता नाही हे समजून येते. (PCMC)

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये कुठलीही वाढ केली नाही. तसेच 2019 मध्ये या देशात 14 कोटी शेतकरी आहेत असे जाहीर केलेले असताना, मागील चार वर्षांपासून केवळ दहा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. उरलेले चार कोटी आणि त्यामध्ये सुद्धा जे वाढलेले शेतकरी आहेत त्यांच्यावर मात्र अजूनही अन्याय होत आहे.

शेती संशोधन प्रक्रिया खाजगी क्षेत्राला देण्याचे घोषित करून कृषी क्षेत्रावरील सरकारचे नियंत्रण काढून टाकण्याचे प्रयोजन हे धोकादायक आहे. खतांवरील सबसिडी मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कपात करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना शेतमालावर स्वामीनाथन समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजनेप्रमाणे कृषी मालाला किमान हमीभाव देण्याचे कुठलेही ठोस आश्वासन या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेले नाही. मनरेगा ही योजना ग्रामीण भागामधील बेरोजगार नागरिकांसाठी खूप उपयोगी योजना असताना सुद्धा यावरील आर्थिक तरतूद ही मागील दोन वर्षांपेक्षा कमी करण्यात आली आहे. (PCMC)

इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये थोडेफार बदल करून सर्व सामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा देण्याचे नाटक या सरकारने या अर्थसंकल्पामधून केलेले आहे. स्टॅंडर्ड डिडक्शन ची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये पर्यंत करून थोडासा दिलासा देण्याचे काम या अर्थसंकल्पात झालेले दिसते.

अनेक समाज कल्याणकारी योजना अशा आहेत की, ज्या मागील दहा वर्षांपासून केवळ कागदावर जाहीर केल्या जातात, परंतु त्याच्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही. भांडवलदारांच्या फायद्यासाठी प्रॉपर्टी टॅक्स मध्ये पुन्हा सूट देण्यात आलेली आहे. दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजासाठीच्या योजना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुदींमध्ये कपात करण्यात आलेली आहे. (PCMC)

थोडक्यात आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा आपल्या राजकीय भागीदारांना खुश करण्यासाठी आणि आपल्या आश्रयदात्या भांडवलदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी केलेला असून, यामध्ये शेतकऱ्यांसाठी, दलित आदिवासी आणि भटके विमुक्त समाजासाठी खूप दिलासादायक असे काहीही नाही.

मानव कांबळे
अध्यक्ष – स्वराज अभियान महाराष्ट्र

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय