Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : बोऱ्हाडेवाडी ‘टी.पी. स्कीम’मधून रहिवाशी क्षेत्र वगळले!

PCMC : बोऱ्हाडेवाडी ‘टी.पी. स्कीम’मधून रहिवाशी क्षेत्र वगळले!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील वाढीव हद्दीतील मौजे बोऱ्हाडेवाडी येथे नगर रचना योजना (T.P. Schemes) मधून रहिवाशी क्षेत्र वगळण्याबाबतचा प्रस्तावाला महानगरपालिका सर्वसाधरण सभेत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. रहिवाशी क्षेत्र वगळण्यात आल्यामुळे आता ‘ग्रीन झोन’मध्ये टी.पी. स्कीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे. (PCMC)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार महानगरपालिका प्रशासनाने नगर रचना योजना राबवण्यास सुरूवात केली होती. मात्र, बोऱ्हाडेवाडी येथील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र यांनी निवासी क्षेत्र या योजनेतून वगळवावे. या करिता योजनेला विरोध केला. भूमिपुत्रांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे या प्रकरणात पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, भूमिपुत्रांचा विरोध असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने टी.पी. स्कीममधून बोऱ्हाडेवाडीतील रहिवाशी क्षेत्र वगळावे. या करिता महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. नगर रचना योजनामध्ये बोऱ्हाडेवाडीतील गट क्र. ग. नं. ६६ , ६७ , ६९, ७०, ८३, ८६, ३१, ३०, ३२ बाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये शेती विभागातून रहिवास विभागात फेरबदल झालेला असल्याने यास शुद्धीपत्रक करुन हा भाग योजनेतून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आता टी.पी. स्किम रहिवाशी क्षेत्र वगळून राबवावी. या करिता आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, रहिवाशी क्षेत्र वगळण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार, कार्यवाही झाली आणि या प्रस्तावाला महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. (PCMC)

बोऱ्हाडेवाडी गावातील निवासी क्षेत्र नगर रचना योजना (टी.पी. स्कीम)मधून वगळण्याबाबत काही शेतकऱ्यांनी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार, महानरगपालिका प्रशासन, नगर रचना विभागाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने टी.पी. स्कीममधून विरोध असलेल्या नागरिकांचा भाग वगळण्याबाबत प्रस्तावाला मान्यता दिली आहे. रहिवाशी क्षेत्र वगळून टी.पी. स्कीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे बोऱ्हाडेवाडी-मोशी परिसराचा सर्वसमावेश विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय