Wednesday, February 12, 2025

PCMC : राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जेएसपीएम संचलित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ३५० रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले.

राज्यामध्ये सध्या रक्ताची गरज असताना एक सामजिक भान ठेवत ताथवडे संकुलातील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

यामध्ये लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी,राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सहभागी झाले होते.

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ताथवडे संकुलाचे संचालक सुधीर भिलारे, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य डॉ. अविनाश देवस्थळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बाळासाहेब गाडेकर, एन. एस. एस.चे विद्यार्थी प्रतिनिधी सुयश शिंदे, संस्कृती कवडे, मंथन देवरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles