पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. (PCMC)
रक्तदान शिबिराची सुरुवात चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि राष्ट्रीय सचिव सलीम शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या रक्तदान शिबिरास पोलीस कर्मचारी व इतरांनी भरभरून प्रतिसाद दिला. (PCMC)
पिंपरी चिंचवड चिखली पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस भगिनी आणि सर्व पोलीस कर्मचारीसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश ढवळे व संभाजी कडलग, महिला पोलीस हवालदार दीपमाला लोहोकरे यांचे विशेष सहकार्य लाभले तर या रक्तदान शिबिरास पिंपरी चिंचवड शहर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांचा सत्कार सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे यांनी केला.
मानव अधिकार संघटना आणि प्रशासन एकत्र काम करताना क्वचितच पाहायला मिळते त्याचेच एक उदाहरण म्हणजे चिखली पोलीस ठाणे लोकसंख्या आणि पोलीस प्रशासन कर्मचारी संख्या पाहता पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण असल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत मानव अधिकार संघटना जनता आणि प्रशासन यामधील दुवा म्हणून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशाच या सामाजिक बांधीलकीतून पोलीस स्टेशन मध्ये या पुढेही असेच वेगवेगळे उपक्रम राबविले जातील असे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.
रक्तदान शिबिर हे लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने राबविण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास कधीही रक्त हवे असल्यास ब्लड सेंटर नेहमीच सहकार्य करेल असे लाईफ लाईन ब्लड सेंटरच्या संचालिका विजयमाला साखरे यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिरास माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश मोरे, समाजसेविका सारिका पवार, सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील तसेच काही आस्थापनाचे डायरेक्टर यांनी भेट देऊन प्रतिसाद दिला.
मानव अधिकार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार, पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पुष्पा बोत्रे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, मिरज शहर अध्यक्ष अभिजित पाटिल, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेंद्र शेळके व राजेंद्र नंदरगी, खेड तालुका अध्यक्ष अमोल नेपते, विरार शहर अध्यक्ष किशन मकवाना आणि संस्थेचे सदस्य सलमान शहा, आशिष कदम, अभिजित अगवणे, आदिनाथ शिंदे,प्रकाश रसाळ, बरून महाता, पंकज भिरुड, प्रसाद बेलोटे, राहुल गवळी यांनी शिबिराचे आयोजन व रक्तदान करून शिबीर यशस्वी करत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.
चिखली पोलीस ठाणे येथील सुमारे पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली असून या रक्तदानाची सुरुवातच महिला पोलिसांनी रक्तदान करून केले ही एक कौतुकास्पद बाब आहे. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा कमी करण्यासाठी महिला सशक्तीकरणासाठी, गरजूंना मदत मिळविण्यासाठी, नागरिकांच्या हक्का साठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ आपली सभासद संख्या वाढवत असून समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी संस्थेला जोडले जाऊन देशहिताच्या नवीन चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांनी या प्रसंगी केले. (PCMC)
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे मधील सर्वच सहकारी चांगले उपक्रम राबवत असून संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांना सन्मानपत्र देऊन पुणे टीमचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांच्याकडून करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मार्च रोजी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने चिखली पोलीस ठाणे येथील महिला पोलिसांसाठी अध्यात्मातून सशक्तीकरण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी सांगितले.