Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करणाऱ्या खासदार कंगना राणावत यांचा भाजपने...

PCMC : प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करणाऱ्या खासदार कंगना राणावत यांचा भाजपने राजीनामा घ्यावा – काशिनाथ नखाते

खासदार कंगना राणावत यांचा निषेध, चप्पल मारो आंदोलन (PCMC)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने आणि समर्थनातून अनेक वेळा महापुरुषांचे अवमान करणे महाराष्ट्राबद्दल द्वेष भावनेतून वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत यांना मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीतून भाजपने शाब्बासकी दिली आहे.

तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे जागतिक दर्जाचे आंदोलन झाले आणि सरकारला झुकावे लागले मात्र आंदोलनादरम्यान पंजाबचा बांगलादेश झाला असता, शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी बलात्कार व हत्या झाल्या असा गंभीर आणि चुकीचे व अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने केवळ समाज नाहीतर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी अशी टीका राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे प्रामाणिक पणे आणि १३ महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणाऱ्या आंदोलनाला बदनाम करणाऱ्या कंगना राणावत यांचा आज जोडे मारून निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश सचिव तुषार घाटोळे, वाहतूक विभागाचे नाना कसबे, इरफान चौधरी, राजू बिराजदार, सहदेव होनामाने, विकास पाटील, लाला राठोड, यासीन शेख, बालाजी बिराजदार, युनूस पटवेकर, राधा मोरे, अंजना शिंदे, वंदना भोसले, राणी बनसोडे आबा शेलार आदी उपस्थित होते. (PCMC)

यावेळी नखाते म्हणाले की, सुमारे १३ महिने दिल्लीच्या प्रवेशद्वारावर ऐतिहासिक आंदोलन झाले आणि मोदी सरकारच्या कालावधीमध्ये प्रथमच पंतप्रधानांना समोर येऊन शेतकऱ्यांची माफी मागत हे कायदे मागे घेत असल्याची भूमिका जाहीर करावी लागली, इतके मोठे हे जागतिक दर्जाचे आंदोलन झाले, हे आंदोलन प्रामाणिक होते तर देशभरातील आणि महाराष्ट्रातील जनआंदोलनासाठी प्रेरणादायी तसेच दिशादर्शक होते आणि आंदोलनाला अशा प्रकारचा बदनाम करणे हे कंगनासारख्या लायकीच्या नसलेल्या व्यक्तीकडून वारंवार होत आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम केल्याप्रकरणी एमएसएफ जवान कुलविंदर कौर यांनी तिच्या कानाखाली मारलेली होती.

यापूर्वीही कंगना राणावत यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहेत, तसेच भारताला स्वातंत्र्य १९४७ ला नाही तर २०१४ ला मिळालेला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून क्रांतिकारकांची महापुरुषांची बदनामी केली त्यांचा अवमान करणे यासाठीच भाजपने त्यांना पुढे केलेले आहे, आणि त्यांना खासदारकी दिलेली आहे, मात्र आता कालच भाजपने भूमिका जाहीर करत कंगनाचे वक्तव्य हे भाजपचे नसल्याचा जाहीर केला आहे, मात्र हे पुरेसे नसून प्रथम त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा हरियाणा निवडणुकीत भाजपला बरोबर जागा दाखवतील.

संबंधित लेख

लोकप्रिय