पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज व क्विल हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा जनजागृतीचा उपक्रम गेले दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. (PCMC)
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी पिंपरी चिंचवड शहर, रुपीनगर, तळवडे, लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई, नागरी वस्ती, बस स्थानके येथे प्रत्यक्ष जाऊन सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन करून नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
या कार्याची दखल घेत, क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील आयोजित कार्यक्रमात त्यांना आठ श्रेणीपैकी पाच श्रेणीमध्ये सर्वाधीक पुरस्कार महाविद्यालयाने पटकाविले. त्यात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट सायबर सुरक्षे करिता सायबर शिक्षण हा राष्ट्रीय पुरस्कार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांनी स्वीकारला.
तसेच शिक्षक श्रेणीत महाविद्यालयातील डॉ. हर्षिता वाच्छांनी, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. उज्वला फलक सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती विजेता पुरस्कार विद्यार्थी दिपू सिंग, सर्वोत्कृष्ट पी.आर. मीडिया डायरेक्टर फर्स्ट विद्यार्थिनी बतुल परवाला. सर्वोत्कृष्ट सायबर वॉरियर्स पहिली धावपटू विद्यार्थिनी श्रावणी सावंत, ओम जगताप यांनाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (PCMC)
सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड्स या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या समवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, सायबर चे उपमहा निरीक्षक संजय शिंत्रे. क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हिल व्यवस्थापकीय संचालक डॉ कैलास काटकर सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी समवेत विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रतिभा महाविद्यालयाला मिळालेल्या दैदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करून प्राचार्य डॉ.ए.के.वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया समवेत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
PCMC : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजला सायबर सुरक्षा अभियान उपक्रमात सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार
- Advertisement -