भांडार विभागाचे उपायुक्त निलेश भदाणे यांची चौकशी करावी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर (PCMC)
पिंपरी चिंचवड – महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना बसण्यासाठी बेंच (बाक ) तसेच शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभाग यांच्या वतीने दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पण गेली ८ महिने होऊन सुद्धा तांत्रिक अडचणी मध्ये सदर निविदा प्रक्रिया अडकली आहे त्यामुळे बेंच पासून विध्यार्थी वंचित राहू नये म्हणून सदर निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. (PCMC)
भांडार विभागाच्या वतीने दिनांक २७.९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या काळात निविदा काढण्यात आली पण सदर निविदा ही मर्जीतील ठेकेदार याला लाभ मिळावा ह्या हेतूंनी तयार केली असल्याने दिनांक १८.१० २०२४ रोजी सदर निविदा प्रक्रियेतील अटी शर्ती बदल करावा म्हणून निवेदन दिले आणि सदर निविदा प्रक्रिया याला प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा दिनांक २०.१२.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधी करिता पुन्हा नव्याने ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दिनांक १८.१०.२०२४ आणि ०८.११.२०२४ रोजी मा. आयुक्त साहेब आपणांस निवेदनाच्या माध्यमातून सदर निविदा प्रक्रिया ही शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या २ ठेकेदार यांना लाभ मिळावा ह्या हेतूने त्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली होती याबाबत आहे हे निवेदनाच्या माध्यमातून सादर केले आहे. यावर आपल्या वतीने संबंधित भांडार विभागाचे उपायुक्त श्री निलेश भदाणे यांना सूचना करण्यात आली त्यानुसार त्यानी काही ठराविक शुल्लक अटी जसे की , कामाच्या अनुभव १ ते ७ वर्षाचा असवा असा बदल केला आहे. जो की पूर्वी ७ वर्षाचा असावा असा होता. पण ज्या मुख्य अटी शर्ती ठराविक संस्थांच्या प्रमाणपत्राच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या तशाच आहेत ठेवण्यात आल्या.
म्हणून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व ठेकेदार यांची एक पुन्हा प्री बीड मीटिंग घेऊन निविदा अटी शर्ती याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. तसेच शहरातील उद्योजक यांना भाग घेता येईल अशा अटी शर्ती टाकण्यात याव्यात अशी मागणी दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा निवेदनांच्या माध्यमातून मा.आयुक्त साहेब यांना करण्यात आली. पण आज ४ महिने होऊन सुद्धा संबधीत निविदा प्रक्रिया बाबत कोणताही निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला नाही. यामुळे सदर खरेदी गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. (PCMC)
सदर निविदा मर्जीतील ठेकेदार यांच्या करिता तयार करण्यात आली असून भांडार विभागाचे उपायुक्त निलेश भदाने यांचा टेंडर प्रकियेत सहभाग आहे त्यामुळे त्यांचे अधिकार काढून चौकशी करण्याची वेळोवेळी मागणी केली पण संबधीत अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही तसेच सदर निविदा ही गेल्या ८ महिन्यापासून का प्रलंबित आहे याची तपासणी सुद्धा करण्यात आली नाही. तरी सदर निविदा प्रक्रिया ही भांडार विभागाचे उपायुक्त श्री.निलेश भदाने यांच्या मुळेच पूर्ण झाली नाही आहे. (PCMC)
मर्जीतील ठेकेदार पात्र व्हावा म्हणून त्याला डोळ्यासमोर ठेवून अटी शर्ती टाकण्यात आल्या मग जेव्हा निवेदनाच्या माध्यमातूनच मागणी केली तेव्हा अनुभव अटीत बदल केला आणि अटी शर्ती बदलल्या असे दाखविण्यात आले. पण खरे पाहता त्या ठेकेदाराला पात्र होता येईल अशा पद्धतीने ही निविदा बनविण्यात आली आणि तो ठेकेदार पात्र सुद्धा झाला पण जेव्हा कागदपत्रं सादर करण्यात आली तेव्हा सदर कागदपत्रं आणि अनुभव प्रमाणपत्र यात फेरफार करून ती बनावट, खोटी असल्याबाबत टेंडर लिपिक यांना शंका आल्याने त्याने सदर निविदा प्रक्रियाबाबत ( टेंडर फाईल वर शेरा देऊन ) उपायुक्त श्री.निलेश भदाने यांना कळविले आहे. तरी सुद्धा उपायुक्त श्री.निलेश भदाने हे कोणतेही कारवाई संबधीत निविदा बाबत अथवा ठेकेदाराच्या बाबत केली नाही त्यामुळे त्यांच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे. तरी सदर निविदा पारदर्शक होण्यासाठी सदर निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी तसेच विशिष्ठ किंवा ठराविक ठेकेदार यांना लाभ होण्याच्या हेतूने अटी शर्ती तयार करून टेंडर प्रक्रियेत रिंग करणाऱ्या भांडार विभागाचे उपायुक्त श्री.निलेश भदाणे यांची चौकशी करण्यात यावी आणि या निविदा प्रक्रियेचे अधिकार त्यांच्या कडून काढून घेण्यात यावे. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : बेंच खरेदीत रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा
---Advertisement---
- Advertisement -