पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प ‘‘विकसित भारत’’ चा निर्धार करणारा आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आम्ही या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे. या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. १ कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, गरिबांसाठी हक्काचे घर योजना, १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवणे असे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
तसेच, ‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून ३ कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प, ९ कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. तब्बल ११ लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे. प्रधानमंत्री किसान योजनेतून ११ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसंच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी संधी देण्यात येणार आहे.
विकासाला चालना… रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर विकसित भारताची दिशा ठरवणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तयार केला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC:अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे.‘‘विकसित भारत’’ चा निर्धार करणारा अर्थसंकल्प आहे-आमदार महेश लांडगे
---Advertisement---
- Advertisement -