पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्या ‘अंकिता उर्फ राणू अक्का इंगळे व सिद्धी शिंदे यांनी एक अनोखे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी प्रथमच महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातामध्ये राखी बांधली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजही स्त्रीविषयी असलेल्या आदराचा इतिहास या रक्षाबंधन सणातून अंकिता इंगळे व सिद्धी शिंदे या दोघींनी जागृत केला आहे.
यामधून छत्रपती शिवाजी महाराज कायम स्त्री नारीचा सन्मान करायचे स्त्रीला कायम आदराची वागणूक द्यायचे तर वेळ आल्यास स्त्रीला आपल्या आया-बहिणींप्रमाणे नाते कायम दृढ ठेवत होते. हे या रक्षाबंधनातून एक बहीण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती आजची आपला भाऊराया समजून हातात राखी बांधते. यातून रक्षाबंधन सण साजरा करीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे खरे काम अंकिता व सिद्धी ताईंनी करून दाखवल्याचे समोर आले आहे.

या अनोख्या रक्षाबंधन सणाची चिंचवड पंचक्रोशीत चर्चा होत असून आजही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या बहिणीचे प्रेम यातून दिसून आल्याने अंकिता इंगळे व सिद्धी शिंदे यांचे इतिहास जागृत केल्याबाबत कौतुकास्पद चर्चा महिला व नागरिक होत आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक यशवंत कण्हेरे व शिवानंद चौगुले यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.


