Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : उद्योजक हांडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

PCMC : उद्योजक हांडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ग्लोबल रीसर्च कॉन्फरन्स फोरम, चिंचवड आणि बॅंकॉक येथील फरानाखोन राजाभट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बॅंकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उद्योजक विनोद हांडे यांना इंडो- थाई बिझनेस एक्सलन्स ॲवार्ड देवून गौरविण्यात आले. (PCMC)

यावेळी लंडन येथील इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ विधितज्ज्ञ डॉ. आदिश सी. अग्रवाला, आंध्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा ओएसडी प्रा व्ही कृष्ण मोहन, थायलंडच्या फरानाखोन राजाभट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रियांग कित्रातपोर्न, अरूणाचल प्रदेश मधील हिमालया विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. प्रकाश दिवाकरन, फरानाखोन विद्यापीठाचे डॉ अरुण चायनीत, डॉ जे.पी भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सस्टेनेबल बिझनेस ग्रोथ, चॅलेंजेस, मेझर्स ॲंड सोल्यूशन्स इन ग्लोबल सिनेरिओ या विषयीच्या परिषदेत जगभरातील १३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

श्री. विनोद हांडे हे चाकण येथील ग्रीन एंव्हायरोसेफ इंजिनियर्स अँड कॅन्सलटंटचे संचालक आहे. या लॅबच्या माध्यमातून हवा, पाणी, अन्नाची गुणवत्ता परीक्षण आणि विश्लेषण केले जाते. या परीक्षाचा शेतकऱ्यांना फायदा होतो.तसेच औद्योगिक अनुपालन, अन्न सुरक्षा मानके आणि निर्यात निर्यात केलेले कृषी उत्पादनांची तपासणी केली जाते.

संबंधित लेख

लोकप्रिय