Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आरुष डोळसला बुद्धिबळात कॅंडीडेट मास्टरची पदवी बहाल

PCMC : आरुष डोळसला बुद्धिबळात कॅंडीडेट मास्टरची पदवी बहाल

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सांगवी येथील बुद्धिबळपट्टू आरुष डोळसला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटना (फिडे) कडून अधिकृतपणे कॅंडीडेट मास्टर ही पदवी बहाल करण्यात आली आहे . त्यामुळे भविष्यात तो नावाच्या पुढे कॅंडीडेट मास्टर (सी एम) लावू शकतो. (PCMC)

मास्टर आरुषने वयाच्या ५ वर्षांपासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तो 7 वर्षाखालील जिल्हा चॅम्पियन ठरला आणि त्याने 2019 मध्ये जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. दोन हजारहून अधिक एलो पोइंट व जागतिक शालेय बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यामुळे फेडरेशन इंटरनॅशनल दि चेस (फिडे) यांच्या कडून आरुषला कॅन्डीडेट मास्टर ही पदवी मिळाली. (PCMC)

फिडेचे अध्यक्ष अरकॅडी दोरकोवीच यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मेलद्वारे प्राप्त झाले आहे. अशी माहिती आरुषचे वडील नेत्रतज्ञ डॉ.बबन डोळस यांनी दिली.

बुद्धिबळात कॅंडीडेट मास्टर पदवी मिळवणारे अत्यल्प खेळाडू आहे . आरुष हा त्यापैकीच एक आहे.
आरुष सध्या कुंटे बुद्धिबळ अकादमीचे आंतरराष्टीय मास्टर अभिषेक केळकर यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तो पिंपळे सौदागर येथील विबग्योर राईस शाळेत सातवीत शिकत आहे.

आरुष हा बुद्धीमान बुद्धिबळपटू आहे. त्याला बुद्धिबळ खेळणे कायम सुरू ठेवायचे आहे. लवकरच आंतरराष्टी्य मास्टर आणि ग्रॅंडमास्टर पर्यंत मजल मारायची आहे. अशी अपेक्षा आरुषने व्यक्त केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय