Thursday, February 20, 2025

PCMC : शिवजयंती निमित्त अस्तित्व फाउंडेशनचे शिवनेरी किल्ल्यावर गडकिल्ले स्वच्छता अभियान

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – अस्तित्व फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती निमित्त गडकिल्ले स्वच्छता अभियानांतर्गत आठव्या वर्षी शिवनेरी गडावर दिनांक ९ फेब्रुवारी रोजी “स्वच्छता मोहीम” आयोजित करण्यात आली. शिवनेरी गडावर आयोजित या अभियानात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. (PCMC)

स्वराज्यातील गडकिल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांची स्वच्छता ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे, किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना सुद्धा गड स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

या वर्षीच्या स्वच्छता अभियानाचे नियोजन फाउंडेशनचे सदस्य खुशाल काळे आणि सुमित राक्षे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

यावर्षीच्या गडकिल्ले स्वच्छता अभियानात राजकुमार सांगोळे, रुषिकेश पाटील, प्रीतम पाटील, अथर्व ढवळे, सावन सांगोळे, निरंजन देवकर, विजय आगळे, हार्दिक गायकवाड, हर्ष मिरघे, प्रणव नवले, निलकंठ माने, कासलिंग गोरे, भूपेश गाजरे, अतुल ठाकरे, शंकर भिसे, विनायक भिसे, प्रशांत देशमुख, वैभव पाटणकर, खंडेराव लवटे, मोहित गौत्रे, ओम चव्हाण, नितीश काळे, लक्ष्मण देसाई, संकेत बोडके आदि सहभागी शिवप्रेमींनी गडावरून प्लास्टिक कचरा संकलित केला आणि गडकिल्ले स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली. (PCMC)

अस्तित्व फाउंडेशनने या अभियानासाठी सर्व सहभागींचे आणि शिवनेरी गडावरील पर्यटकांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles