पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – डोक्याला भगवा फेटा, अंगावर लांबसडक असे भगवे वस्त्र परिधान करून अगदी हुबेहूब पोशाखात निगडीत अवतरले युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद.डॉ. दत्तात्रय खुणे असे स्वामीजींची भूमिका साकारणाऱ्या प्राध्यापकांचे नाव आहे. (PCMC)
निमित्त होते स्वामी विवेकानंद जयंतीचे. निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ अरविंद तेलंग वरिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. दत्तात्रय खुणे यांनी स्वामी विवेकानंदाच्या पेहरावात आले आणि आपले विचार मांडले. अगदी स्वामीसारखी सारखीच देहबोली, स्वामी विवेकानंदाचे बालपण, बालपणातील त्यांच्या आठवणी, गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरु शिष्याचे दृढ नाते यांच्यातील स्नेहसंबंध, संवाद, आणि शिकवण हे विचार मांडताना प्रसंग हुबेहूब उभे केले. मानवी जीवनात ध्यानाचे आणि एकाग्रतेचे अमूल्य महत्त्व असल्याचे सांगितले. बालविवाह आणि स्त्री मुक्ती , गोरगरीब दलितांसाठी असणारे आरक्षण यांचे समर्थन, आणि हिंदू-मुस्लिम समन्वय हवा याविषयी त्यांचे विचार मांडले.
PCMC
अमेरिकेतून भारतात आल्यानंतर भारतीय युवकांना चला उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका अशी हाक दिली. त्या प्रसंगाची आठवण करून दिली.कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पाटील यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे आयोजन प्रा ज्योती वाणी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आरती शेगोकार यांनी तर आभार प्रा शुभांगी गायकवाड यांनी मानले.
PCMC : निगडीत अवतरले स्वामी विवेकानंद
- Advertisement -