पिंपरी चिंचवड – बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएसपीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या आदेशाने यापूर्वीची पुणे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. (PCMC)
बीएसपीचे महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांना नवीन कार्यकारणी नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. हुलगेश चलवादी यांनी आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते अशोकराव गायकवाड यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे, तसे नियुक्ती पत्र चलवादी यांनी गायकवाड यांना दिले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, पक्षाचा निळा झेंडा आणि हत्ती हे पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढविणार असल्याचा निर्धार डॉ. हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला आहे. (PCMC)