Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जगात शांतता भारत देश निर्माण करू शकेल - दारासिंग मन्हास

PCMC : जगात शांतता भारत देश निर्माण करू शकेल – दारासिंग मन्हास

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने केशवनगर, चिंचवड मध्ये मानवी हक्क दिन साजरा (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – दि. १० – वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक आणि राष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी दारासिंग मन्हास यांनी सांगितले की, जगभरच्या सध्या सुरू असलेल्या युद्ध आणि सशस्त्र संघर्षांमध्ये सामान्य लोकांच्या   मानवाधिकार हक्काचे  गंभीर उल्लंघन होत आहे, जगात  शांतता भारत देश निर्माण करू शकेल. (PCMC)

भारत देश हा जगात सर्वात मोठा लोकशाहीवादी देश असून येथे प्रत्येकाला संविधानाने मानवी हक्क व अधिकार प्रदान केलेले आहे. त्यात आपआपल्या परीने राहणीमान, शैक्षणिक अधिकार, धार्मिक विधी, लिखाण स्वातंत्र्य,भाषण स्वातंत्र्य, इ. अनेक मूलभूत अधिकार आपणास प्राप्त झाले आहेत.

पूर्वी समाज एकत्र व गुण्यागोविंदाने राहत होता. आज माणूसकी व मानवी अधिकाराची पायमल्ली होत आहे. समाजात व्यभिचार, अत्याचार  व भष्टाचार वाढला आहे. जातीजातीत व धर्मातील संघर्ष वाढला आहे.

जगात वर्चस्व निर्माण करण्यासाठी युध्द लादले जात आहे. यात प्रचंड प्रमाणात मनुष्य हानी होत आहे. मानव अधिकार आबाधित राहण्यासाठी   महात्मा गांधींच्या अहिंसेची व भगवान गौतम बुध्दांच्या शांतीची आवश्यकता आहे. ती प्रत्येकाने अवलंबली तरच  मानव अधिकार आबाधित राहील.भारत शांततावादी पण बलशाली देश आहे, इथे कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे कोणावर अन्याय झाला की, आपण त्यांना न्याय मिळवून देतो. असे दारासिंग मन्हास म्हणाले.

गोरगरीब विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक दत्तक योजना राबवणार

समाजातील विविध प्रवर्गात मानवी हक्कांविषयी जाणीव निर्माण करणे आणि प्रसिद्धी व प्रसार माध्यमे, संमेलने व अन्य उपलब्ध साधनांद्वारे मानवी हक्क संरक्षणाच्या उपलब्ध तरतुदीं विषयी जागृती वाढावी म्हणून प्रयत्न करणे. हे आपले कर्तव्य आहे,

गोरगरीब लोकांच्या  उन्नतीसाठी  सेवाभावी कार्य केले पाहिजे. वंचित, विधवा, अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचे पूर्ण सक्षम करण्यासाठी शैक्षणिक विद्यार्थी दत्तक योजना आम्ही राबवणार आहोत, त्यांना सक्षम करणे हेच आजच्या दिवसाचे महत्वाचे उदिष्ट आहे. असे दारासिंग मन्हास यांनी म्हटले आहे.

वुई टुगेदर फाउंडेशनच्या (We together foundation) वतीने केशव नगर, चिंचवड येथे  संस्थेचे माजी सचिव शंकरराव कुलकर्णी  मानवी हक्काची संयुक्त राष्ट्र संघाच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या  मानवी हक्क आयोगाची  माहिती दिली.

संस्थेचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी वुई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे यांचे सासरे ह.भ.प. प्रभाकर मारुती भिवरे यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शंकरराव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मानवी समाजाच्या मूलभूत जगण्याच्या स्वातंत्र्यासाठी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. मानवी हक्कांमध्ये आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचाही समावेश होतो. मानवाधिकार हे असे मूलभूत नैसर्गिक हक्क आहेत की, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तिला निर्भय आणि मुक्त जीवन जगता येते. समाजातील वंचित घटकाचे हक्कासाठी आपण काम करत राहू असे शंकरराव कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष सलीम सय्यद यांनी केले.

यावेळी सलीम सय्यद, जयंत कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, विलास गटणे, उल्हास दाते, शंकरराव कुलकर्णी, धनराज गवळी, मच्छिंद्र थोरवे, अर्चना बच्चे आदी मान्यवर उपस्थित होते.

PCMC

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय