Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आपुलकीच्या गाठीभेटी अन् महेश लांडगे यांच्या विजयाचा विश्वास!

PCMC : आपुलकीच्या गाठीभेटी अन् महेश लांडगे यांच्या विजयाचा विश्वास!

महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांचा नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका (PCMC)

चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती , सद्गुरुनगर भागातील मतदारांनी दिला विजयाचा विश्वास

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती , सद्गुरुनगर या भागांमध्ये गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (PCMC)

दरम्यान, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार लांडगे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना तसेच दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून महेश लांडगे यांना मतदान करावे, असे आवाहन करताना दिसत आहेत

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिवाळीचे औचित्य साधून मतदारसंघातील चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, सद्गुरुनगर या भागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

विशेषतः जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. कठीण काळात नेहमी आपली पाठराखण करणाऱ्या महेश लांडगे यांच्या पाठीशी आमचे आशीर्वाद असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. महिला भगिनींनी यावेळी ठिकठिकाणी औक्षण करून लांडगे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (PCMC)

सध्या विधानसभा निवडणूक आणि दिवाळीची धामधूम सुरू आहे. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने या भागातील नागरिकांच्या भेटी घेताना परिसरातील मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले. स्थानिक मतदार व कार्यकर्त्यांच्या आपुलकीच्या भेटीगाठी घेतानाच त्यांच्याशी संवाद साधला.

प्रतिक्रिया :

दिवाळीनिमित्त चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, सद्गुरुनगर या भागातील अबालवृद्धांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. येथील नागरिकांशी अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. माझे बालपण या भागामध्ये गेलेले आहे. विधानसभा निवडणूक एक निमित्त आहे. दिवाळीनिमित्त येथील नागरिकांना मी नेहमीच भेटत असतो.

यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुण वर्गाची सोबत घेऊन निवडणुकीला सामोरा जात आहे. यामध्ये त्यांची भक्कम साथ आहे, असा विश्वास भेटीगाठीच्या निमित्ताने मिळाला आहे.
महेश लांडगे, आमदार भोसरी, विधानसभा, भाजप पिंपरी.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय