Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : जयंत पाटील यांचेकडून महापालिकेत पथविक्रेता समितीपॅनल निवडून आणल्याबद्दल कौतुक.

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झाली यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. याबद्दल कामगार नेते काशिनाथ नखाते व विजयी उमेदवार , पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज कौतुक केले. (PCMC)

यावेळी किरण साडेकर, प्रल्हाद कांबळे,किसन भोसले, सलीम डांगे, राजू बिराजदार ,लक्ष्मण शेरखाने,संतोष माळी, राजेश माने आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थापनेपासून आजपर्यंत आयुक्ताच्या नियुक्तीने समितीचे सदस्य नियुक्त करण्यात येत होते. (PCMC)

मात्र पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदासाठी ८ सदस्यांची निवडणूक झाली. पथारी, हातगाडी, टपरी धारकांसाठी काम करणाऱ्या संघटना महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले, या संघटनेने पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी हॉकर झोनची निर्माण निर्मिती केली आणि त्याचबरोबर फेरीवाल्यांच्या परिवर्तनासाठी मेहनत केली त्यामुळे शहरातील सुमारे २०१२१ मतदारानी भरघोस मते देऊन पॅनलच्या ६ उमेदवारांना बहुमताने विजयी केले. (PCMC)

पहिल्याच वेळेला हा विजय झाल्याने महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन झालेले आहे याबद्दल अभिनंदन करत त्यांनी कष्टकरी, गरीब वर्गासाठी अविरत काम करत रहा तसेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत रहा आणि ते लोक तुम्हाला साथ देतील यातून यश मिळत जाईल असा मोलाचा सल्ला पाटील यांनी आज दिला.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles