उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले स्वागत (PCMC)
– फेरीवाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आळंदी नगरपालिका विक्रेता फेरीवाला समिती सदस्यांची बहुमताने निवड झाली. नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन्मान केला. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे हा कार्यक्रम पार पडला. (PCMC)
भगवान वैराट आणि बाबा कांबळे यांच्या दोन्ही संघटना एकत्र आल्यामुळे पाच जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली. तर संतोष सोनवणे बहुमताने विजयी झाले. आळंदी नगर परिषदेमध्ये फेरीवाल्यांची निवडणूक झाली यामध्ये टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेचे सदस्य बिनविरोध निवडून आले.
11 सप्टेंबर 2024, रोजी ही निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांचा नियोजित कार्यक्रम आळंदी मध्ये आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने निवडून आलेल्या सदस्यांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून आलेल्या सर्व मंचक यादव,सुनिता ठुबे ,ज्ञानेश्वर भोसले,संतोष सोनवणे,गणेश काळे,काजल घोडगे
सदस्यांचा सरकार केला.
यावेळी फेरीवाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डी डी भोसले, नगरसेवक प्रकाश कुराडे, टपरी पातळी हातगाडी पंचायत, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, शहराध्यक्ष राहुल कुराडे, तालुका अध्यक्ष सुलतान भाई शेख,
प्रिय सोनवणे, तुषार नेटके, महेश जाधव, गणेश मोटकर, ज्ञानेश्वर शेटे, रमेश म्हात्रे, शिवाजी मुसळे, रामदास म्हेत्रे, शिवाजी जगताप, भानुदास मदने, सुरेश अहिरेकर, राहुल बाजड, शंकर गुंजाळ,शिवाजी जगताप, मीराताई लबडे, शीला मोटकर, सुरेखा कुराडे, नीलम सोनवणे,
आदी यावेळी उपस्थित होते.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, फेरीवाल्या कायद्यामुळे फळभाजी विक्रेत्यांना सन्मान मिळाला. आपल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी या समितीमार्फत पाठपुरावा केला जाईल.
स्वाभिमानाने पोट भरणाऱ्या या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने देखील होणारा त्रास कमी करण्यात समिती प्रयत्न करेल. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
यावेळी निवडून आलेले अपंग सदस्य ज्ञानेश्वर भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारपूस केली. तसेच सर्व सदस्यांची चौकशी करून उत्पन्न बाबत देखील आवर्जून विचारणा केली.