पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर, दि.२३ : भारताच्या चांद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग झाल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने ‘ग’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथे विद्यार्थ्यांना पेठे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा असून चंद्रयान 3 आज इतिहास रचला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आखलेल्या चंद्रयान-३ मोहीमेनुसार आज सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग चंद्रावर यशस्वीपणे करण्यात आले, भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आपच्या स्मिता पवार यांनी सांगितले.
या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाला चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, दत्ता काळजे, सरोज कदम, स्मिता पवार, ब्रम्हानंद जाधव, सचिन पवार, चंद्रमणी जावळे, सुरेश बावनकर, सीमा बावनकर, कमलेश रणवरे, अजय सिंग, राजेश सपारे आदी आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.