Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – आज वटपौर्णिमा असल्याने शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर असलेल्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुवासिनी महिला पारंपारिक वेशभूषा त्यामध्ये नऊवारी साडी, नथ, अंबाडा, सुंदर असे दागिने परिधान करून आलेल्या होत्या. आपली संस्कृती जपत पौराणिक कथेप्रमाणे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. पती पत्नीचे नाते दृढ करत, पतीला वटवृक्ष प्रमाणे आयुष्य मिळावे अशी ही प्रार्थना करतात. (PCMC)

---Advertisement---

पूजेसाठी मंदिराच्या परिसरामध्ये महिलांची रिघ लागलेली होती. सर्वांना सुलभतेने पूजा करण्यात यावी साठी श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.अनेक महिलांनी ग्रुप फोटो तसेच सेल्फी काढून सणाचा आनंद लुटला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles