पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि. १४.०८.२०२२ रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात क्र १८४/२०२२ प्रसिध्द करण्यात येऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील विविध अभिनामाच्या एकुण १५ (अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)) संवर्गासाठी रिक्त असलेल्या ३८८ पदांकरीता संपुर्ण महाराष्ट्र राज्यामधून ८५,७७१ उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने सरळसेवा भरतीकरीता अर्ज दाखल केलेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांसाठी गुरुवारी (दि. १८) पासून परिक्षेकरिता प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांकरीता (दि. २६) रोजी एका सत्रामध्ये, (दि. २७) रोजी तीन सत्रामध्ये व (दि. २८) रोजी तीन सत्रामध्ये परिक्षा आयोजित करण्यात आलेल्या असून त्याकरीता संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण २६ शहरातील ९८ परिक्षाकेंद्र सुनिश्चित करण्यात आलेली असून खालील प्रमाणे परिक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रत्येक परिक्षाकेंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक परिक्षाकेंद्रावर ECIL कंपनीमार्फत Mobile Jammer ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी Frisking, CCTV, IRIS Scanner व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख/पोलीस आयुक्तांना आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे.
शासन निर्णयानुसार दिव्यांगाकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सरळसेवा भरती परिक्षा पारदर्शक पध्दतीने आयोजित केल्या जाणार असल्याने कुठल्याही अमिषाला / गैरप्रकाराला बळी पडू नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सरळसेवा भरती तसेच परिक्षेच्या अनुषंगाने उपरोक्त नमुद महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी जाहिर निवेदन / सुचना प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : ३८८ जागांसाठी ८५ हजार उमेदवार, शुक्रवारपासून परीक्षा
---Advertisement---
- Advertisement -