Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील ५ विद्यार्थिनी विभागीय स्पर्धेसाठी पात्र

PCMC : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील ५ विद्यार्थिनी विभागीय स्पर्धेसाठी पात्र

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेतील ५ विद्यार्थिनी विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून शर्वी बाकलीवाल, वैदेही गांगुर्डे, अर्ना गुप्ता, अनन्या चव्हाण, सिद्धी तोतळे हे खेळाडू विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा सुरु असून नुकतेच १७ वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत आघाडीवर राहिलेल्या या ५ खेळाडूंना विभागीय पातळीवर शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रहाटणी येथील एस.एन.बी.पी. शाळेच्या शर्वी बाकलीवाल हिने अव्वल क्रमांक पटकावला असून वाकड येथील युरो स्कूलच्या वैदेही गांगुर्डे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर रावेत येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती स्कूलच्या अर्ना गुप्ता ही खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर, चिंचवड येथील एल्प्रो स्कूलची अनन्या चव्हाण चौथ्या स्थानी तर रहाटणी येथील एस.एन.बी.पी. स्कूलच्या सिद्धी तोतळे ही पाचव्या क्रमांकावर राहिली. (PCMC)

क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी पात्र खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय