Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिका सेवेतून मुख्य अभियंता, सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखाधिकारी...

PCMC : महापालिका सेवेतून मुख्य अभियंता, सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखाधिकारी यांच्यासह १४ जण सेवानिवृत्त

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह दांडगा असला तरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्विकारावीच लागते, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त करून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (PCMC)

पिंपरी, येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे ऑगस्ट अखेर नियमित वयोमानानुसार आणि स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या १४ अधिकारी, कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. (PCMC)

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, उपअभियंता कविता माने, कार्यालय अधिक्षक अनिता बावीसकर, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार, नथा माथेरे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (PCMC)

नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱअया अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, मुख्य लेखापरीक्षण विभागाचे लेखाधिकारी संदीप वडके, फ प्रभागातील प्रशासन अधिकारी महेंद्र चौधरी, माध्यमिक शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक अरुण फुगे, करसंकलन विभागातील कार्यालय अधिक्षक सुषमा भरविरकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे मुख्याध्यापिका साधना वाघमारे, स्थानिक संस्था कर विभागाचे मुख्य लिपिक दिलावर शेख, विद्युत विभागाचे वायरलेस ऑपरेटर राष्ट्रपाल भोसले, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षक जयश्री तंबाखे, शिक्षण विभागाचे उपशिक्षक राजमाला देशमुख, ड क्षेत्रीय कार्यालयाचे मजूर संजयकुमार हजारे, उद्यान विभागाचे शिपाई दिलीप शिंदे आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले. तर सुत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय